सत्यशोधक समाजाचे प्रथम अधिवेशन पुणे येथील भवानी पेठेतील बालीवाला

प्रसिद्ध झाला. या लेखात सत्यशोधक समाजाची संभाव्य संहिता प्रसिद्ध करून मराठी मुलखातील तमाम सत्यशोधकांना एकत्र येण्याचे आवाहन भास्कररावांनी केले. जाधवांच्या या आवाहनाला सत्यशोधकांनी प्रतिसाद दिला. येथून पुढे सत्यशोधक अधिवेशन मालिकेला प्रारंभ झाला. या मालिकेने सत्यशोधक समाजाची विस्कटलेली घडी सुस्थिर केली.
सत्यशोधक समाजाचे प्रथम अधिवेशन पुणे येथील भवानी पेठेतील बालीवाला
थिएटरात दिनांक १७ एप्रिल १९११ रोजी स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या अधिवेशनाने सत्यशोधक समाजाला एक
संहिता दिली. सत्यशोधक समाजाचे अनेक वर्षांपासून रिक्त असलेले अध्यक्षपद
भरले गेले. नूतन कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले. तसेच या अधिवेशनाने
सत्यशोधक कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविला. अधिवेशन चळवळीने इ. स.
१९३० पर्यंत एक झंझावात निर्माण केला. या कालखंडात सत्यशोधक समाजाचा एक तळपता इतिहास निर्माण झाला. या बाबीचे बरेचसे श्रेय जाधवांकडे जाते. सत्यशोधक समाजाचे चौथे अधिवेशन पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथे दि. २५ व २६ एप्रिल १९१४ रोजी नारायण गोविंदराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. लगेचच दिनांक ११ व १२ मे १९१५ ला अहमदनगर येथे बागडे थिएटरमध्ये समाजाचे पाचवे अधिवेशन प्रा. अण्णासाहेब लड्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रस्तुत दोहो अधिवेशनाला जाधवांनी मार्गदर्शन केले होते. समाजाचे सहावे अधिवेशन कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी (तालुका-चिकोडी) येथे दिनांक २७ व २८ मे १९१६ रोजी संपन्न झाले. या अधिवेशनाच्या संयोजनात जाधवांचा मोठा सहभाग राहिला. या नंतरचे आठवे अधिवेशन विदर्भातील अकोला येथे भरले. वा. रा. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली या अधिवेशनाला जाधव मुद्दाम कोल्हापूरहून उपस्थित होते.
या नंतरचे अधिवेशन बेळगाव येथे ब्राह्मणेतर अधिवेशनाला जोडून दिनांक १७ मे १९२१ रोजी संपन्न झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ना. भास्करराव जाधव. हे अधिवेशन ब्राह्मणेतर पक्षाच्या अधिवेशनाला जोडून असल्यामुळे एका सत्रातच संपन्न झाले. दुसरे असे की, जाधवांचे या अधिवेशनाचे अध्यक्षीय भाषण अनुपलब्ध असल्याने नेमके या प्रसंगीचे त्यांचे भाष्य उपलब्ध नाही. असे असले तरी जाधवांनी सत्यशोधक समाजाचा तळपता इतिहास या भाषणात विशद
108
सत्यशोधकांचे अंतरंग




