💐अकोल्याच्या माळी समाजाचा शुभेच्छाचा वर्षाव अभिमान! मनीष हिवराळे यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या विश्वस्तपदी निवड

- 💐अकोल्याच्या माळी समाजाचा शुभेच्छाचा वर्षाव अभिमान! मनीष हिवराळे यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या विश्वस्तपदी निवड
💐
अकोला : अखिल भारतीय माळी महासंघाच्या विश्वस्तपदी मनीष भाऊ हिवराळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिरुळकर, प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर, राष्ट्रीय उपाध्यक्ष विठ्ठल आबा तोडकर, महादेव भोसे राऊत आदी मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
मनीष भाऊ हिवराळे हे समाजसेवा, राजकारण आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे नाव आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे अकोला शहराध्यक्ष, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष, तसेच मोठी उमरी वधू-वर मेळावा संयोजक म्हणूनही प्रशंसनीय कार्य केले आहे. गेली २५ वर्षे अखंड समाजसेवा हेच त्यांचे ध्येय राहिले आहे.
सध्या माझी विश्वस्त महादेव भोसे आजारी आहेत त्यांच्या तब्येतीत थोडीशी अस्वस्थता असल्याने महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. भोसे कुटुंबीयांनी या भेटीसाठी आभार मानले. मनीष भाऊ हिवराळे यांच्याकडे आपले विश्वस्त पद बहाल केले
सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी असलेल्या मनीषभाऊंच्या नेतृत्वामुळे माळी महासंघाचे “सोन्याचे दिवस” लवकरच उजाडतील, अशी भावना समाजात व्यक्त होत आहे.
👉 अखिल भारतीय माळी महासंघाच्या उच्चस्तरीय मंडळाने विश्वस्त पद बहाल करून समाजात आदर्श निर्माण केला आहे.
👉 विदर्भ व महाराष्ट्रातील सर्व माळी समाजाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387737801
📣 ही बातमी आवडली का? मग लगेच –
👉 लाईक करा 💬 शेअर करा 🔁 सबस्क्राईब करा 🔔 बेल आयकॉन दाबा!




