महाज्योती कार्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी!

महाज्योती कार्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी!
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर संस्थेच्या मुख्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचार कार्याचा गौरव करणारे मनोगते अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केले. महाज्योती कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचार कार्यावर कर्मचाऱ्यांची निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती,
त्यात सर्व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. यात प्रकल्प अधिकारी पंकज पचारे यांनी प्रथम क्रमांक, सहाय्यक संशोधन अधिकारी श्रीमती उत्कर्षा दंडारे व कार्यालयीन सहाय्यक शुभम दवणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती जयश्री बोदेले व प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे यांनी जबाबदारी बजावली.
महाज्योतीच्या पुणे, नाशिक व छ.संभाजीनगर सहित सर्व प्रशिक्षण संस्थांच्या केंद्रावर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही# महा जाती
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी


