अविस्मरणीय सन्मान

अविस्मरणीय सन्मान
आज 78 व्या स्वातंत्र्याच्या महोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे बुलढाणा शहरवासीयांना सुपरीचित व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध सर्पमित्र एस.बि. रसाळ सर यांना त्यांच्या निस्वार्थ सर्पसेवा आणि निसर्ग सेवेच्या त्याचबरोबर कालपरत्वे दुर्मिळ होत असलेल्या वस्तू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून उपयोगी पडावे म्हणून त्रिशिका प्राचीन वस्तू व नाणी नोटा संग्रह इत्यादी माध्यमातून करीत असलेल्या समाजसेवेबद्दल त्यांचा मा.जिल्हाधिकारी डाॅ किरण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सर्पमित्र रसाळ सरांना कुटुंबासमवेत सन्मानित करण्यात आले. यावेळी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक मा .सुनील कडासने साहेब यांनीही त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊन त्यांचे कौतुक केले, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय संजू भाऊ गायकवाड यांनी रसाळ परिवारांचा गौरव करीत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मा.जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त बुलढाणा जिल्ह्यातील समाजसेवा आणि विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते .काही दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी माननीय डाॅ किरण पाटील साहेबांनी त्यांच्या वाहनाचालकाशी असे विशेष कार्य करणाऱ्या आणि समाज सेवा करणाऱ्या व्यक्तींविषयी चर्चा केली असता वाहन चालक यांनी वर्षानुवर्ष हजारो सापांना जीवनदान देणाऱ्या आणि निसर्ग सेवा करून पर्यावरण संवर्धनात मोलाची कामगिरी करणारे रसाळ सरांच्या कार्याविषयी कथन केले. त्यानंतर काही दिवसानंतरच जिल्हाधिकारी साहेब यांच्या निवासस्थानी निघालेला सापाला जीवनदान देण्यासाठी ज्यावेळेस सर्पमित्र रसाळ सर त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि साप पकडून तो सुरक्षितरित्या बरणी बंद केल्यानंतर जिल्हाधिकारी डाॅ किरण पाटील साहेबांनी रसाळ सरांची विविध प्रश्न विचारून त्यांच्या या कार्याविषयी जाणून घेतले
आणि काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सर्पमित्र रसाळ सरांना त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने एक फोनवरून आमंत्रित करण्यात आले . आणि आज 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या स्वातंत्र्य महोत्सव प्रसंगी मा. जिल्हाधिकारी डाॅ. किरण पाटील साहेब यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
* राम निकम*
सहशिक्षक प्रा. शा. दहा तांडा





