मंडलनामा क्रमशः 32.अस्वल मोर्चा, माकडांचे आंदोलन

मंडलनामा क्रमशः
32.अस्वल मोर्चा, माकडांचे आंदोलन
मुस्लिम अस्वलवाले आणि मुस्लिम रिचवाले हे नाव असलेल्या मुस्लिम जमातीच्या काही जणांना ओबीसी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी आम्हाला कराड, सांगली, गडहिंगलज, कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी या भागात खूप संघर्ष करावा लागला. शासकीय अधिकारी नियमावर बोट ठेवून अडवणूक करत असल्याने संघटनेने कराड येथील प्रांत कार्यालयावर अस्वलांसह मोर्चा काढला होता. हा मोर्चा जाहीर झाल्यानंतर मोठी उत्सुकता निर्माण झाली. मोर्चात माणसे जास्त व एखादे अस्वल राहील, असे अधिकारी व पोलिसांना वाटले. पण आम्ही या भागातील सर्व अस्वलवाल्यांना कराड येथील मोर्चात येण्याचे कळवले. त्यावेळी प्राण्यांचे खेळ करण्यावर बंदी नसल्याने काही जातीचे लोक साप, वानर, माकड, अस्वल पाळून, त्यांच्या कसरती दाखवून पोट भरत असत.
आमच्या आवाहनाला अस्वलवाल्यांनी मोठा प्रतिसाद दिला व कराड शहरात शंभर अस्वले व त्यांचे मालक आले. शहरातील एका मैदानावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा निघाला. अस्वले प्रशिक्षित व त्यांच्या गळ्यातील दोरीचे नियंत्रण अस्वलवाल्यांच्या हाती असल्याने पोलिसांना फार काम पडले नाही. अस्वल मोर्चा पाहण्यासाठी शेकडो कराडकर कामधंदा सोडून रस्त्यावर येऊन उभे राहिले. आमचा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी प्रमाणपत्र जारी करण्यात सहकार्य करण्याचे मान्य केले. या मोर्चानंतर या जमातीच्या लोकांना प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली.
माकडांचा खेळ दाखवून उदरनिर्वाह करणाऱ्या फकीर बंदरवाला समाजाकरिता जत येथे असाच प्रयोग करावा लागला. उनाड अधिकारी व कामचुकार कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी ‘माकडांचे आंदोलन’ पुकारण्यात आले. जत तहसील कार्यालयात फकीर बंदरवाले आपल्या माकडांसह दाखल झाले व टेबलांवर माकडांचा खेळ सुरू केला. त्यांच्या सूचनेनुसार ही माकडं अडवणूक करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जाऊन प्रमाणपत्राची मागणी करू लागली. या आंदोलनानंतर तेथील प्रश्न सुटला.
करमाळ्यात (जिल्हा सोलापूर) एक प्रसिद्ध दर्गा आहे. या दग्र्याजवळ साप पाळणारे गारुडी राहतात. त्यांनाही प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयात साप सोडले. अर्थात हे साप बिनविषारी व दात काढलेले होते. पण या आंदोलनामुळे हाहाकार उडाला व अधिकारी, कर्मचारी नरमले. संघटनेच्या या सारख्या अनेक आंदोलनात पोलिसांचे सहकार्य मिळाले. त्यांनी कोठेच आमची मुद्दाम अडवणूक केली नाही. आमची संघटना न्याय मागण्यांसाठी अहिंसक मार्गाने लढत आहे, अशी त्यांना खात्री होती.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




