सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशः भाग तीन

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशः भाग तीन
त्यशोधकांचे अंतरंग’ हा वाङ्मयीन प्रकल्प मार्गी लागावा म्हणून आठ वर्षांपूर्वी समाजाचे तत्कालीन अध्यक्ष अॅड. वसंतराव फाळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि सत्यशोधक साहित्य, संस्कृती आणि संवर्धन परिषदेचे अध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या उपस्थितीत लातूर येथे एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हा प्रकल्प बांधणीसाठी एक सत्यशोधक लेखकांची समिती गठित करण्यात आली होती. मात्र दोन-तीन वर्षे प्रतीक्षा केल्यानंतरही या समितीकडून काहीच काम न झाल्याने आणि मी त्या समितीतील एक सदस्य असल्याने सत्यशोधकांचा परिचय लिहिण्याचे मनोमन ठरवून लेखणी उचलली. त्याला
तसे तर सत्यशोधक समाज चळवळीच्या अभ्यासांती एक बाब स्पष्ट होते की, सत्यशोधक कार्यकर्त्यांनी सत्यशोधक चळवळीचा इतिहास, सत्यशोधक वाङ्मयाचा इतिहास, सत्यशोधक नियतकालिकांचा इतिहास, सत्यशोधक अधिवेशन मालिकांचा इतिहास शब्दबद्ध केला; मात्र सत्यशोधक चळवळीचा क्रांतिकारी इतिहास ज्यांनी निर्माण केला अशा कार्यकर्त्यांचा परिचय करून देणारा ग्रंथ आणखी उपलब्ध नाही. या अनुषंगाने प्रयत्न झाले. चाळीस-पन्नास सत्यशोधकांवर एका अनामिक सत्यशोधकाचे कच्चे टिपण उपलब्ध आहे. तसेच कोल्हापूरकर एक सत्यशोधक, सत्यशोधक समाजाचे भूतपूर्व अध्यक्ष ना. भास्करराव जाधव यांनी ७०० व्यक्तींची एक सूची तयार केली होती. मात्र ही सूची आज उपलब्ध नाही.
प्रिय वाचक,
भूमिका
आआह बने होत आहेत. हळूहळू या वाङ्मयीन प्रकल्पाचे कार्य पूर्णत्वाकडे जात आहे.
बारा पंधरा-वीस वर्मापासून मी सत्यशोधक चळवळीत सक्रिय आहे. ४. स. १९८३ साली आम्ही काही प्राध्यापक-अध्यापक मित्रांनी जालना .स.तिरावांच्या ‘शेतकऱ्याचा असूड’ ग्रंथाची शताब्दी साजरी केली. जालना जिल्हयातील, अंबड तालुक्यातील जवळपास दहा गावी ‘शेतकऱ्याचा आसूड संचातील शेतकरीविषयक विचार शेतकऱ्यांना त्यांच्याच भाषेत सांगितले, प्रस्तुत अभ्यास आणि अनुभव पुढे कामी आला. त्यामुळे पुढे मी सत्यशोधक चळवीत समरस झालो. चळवळीत सक्रिय असताना सत्यशोधक चळवळीसाठी आवश्यक दहा ग्रंथांचेही लेखन केले. इ. स. २००० नंतर आयोजित सत्यशोधक अधिवेशनांमध्ये आणि सत्यशोधक साहित्य संमेलनांमध्ये जातीने सहभागी होत राहिलो. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई येथे दिनांक ८ व ९ मे २०१० रोजी संपन्न झालेल्या सातव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे मी अध्यक्षस्थानही भूषविले. तसेच जानेवारी २०१५ मध्ये जालना येथे झालेल्या ३७ व्या सत्यशोधकी अधिवेशनाचा अध्यक्षही झालो. त्यामुळे या चळवळीत सातत्याने सहभागी होऊन सत्यशोधक चळवळीचा अभ्यासही अखंड चालू ठेवता आला.
सत्यशोधक समाजाची स्थापना दिनांक २४ सप्टेंबर १८७३ रोजी दिवे लागण्याच्या प्रसंगी बाणेकरांच्या तालमीच्या दक्षिण बाजूच्या चौकातील नाईकांच्या दुमजली घरी (नं. ५२७) जोतिरावांच्या मुशी विकण्याच्या दुकानी, जुनागंज पेठ, पुणे येथे झाली. या क्रांतिकारी प्रसंगी मराठी मुलखातील जवळपास साठ सत्यशोधक उपस्थित होते. या साठ सत्यशोधकांनी याप्रसंगी तळीभंडार उचलून जोतिरावांनी प्रतिपादित केलेली सत्यशोधक मतं ग्रहण केली. तद्नंतर मुंबई, ठाणे, भिल्लार, भांबुर्डे (शिवाजीनगर, पुणे), हवेली, हडपसर, घोरपडी, वानवडी, नेऊरगाव, सासवड, खेड आदी गावी सत्यशोधक समाजाच्या शाखा स्थापन झाल्या. पुढे विसाव्या शतकाच्या आरंभीच्या दशकात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर असंख्य सत्यशोधक शाखा उभ्या राहिल्या. हजारो सत्यशोधक कार्यकत्र्यांनी या शाखा संवर्धित आणि संगोपित केल्या. सत = खरे, शोधक- तपास करणारा, मंडळ = समाज (सत्यशोधक समाज) यासाठी समाजाचा कार्यकर्ता कामी आला.
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴


