बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूर ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी जल्लोष लोककलेचा उद्घाटनास नाट्य व सिनेअभिनेत्री नीलम शिर्के यांची उपस्थिती

बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूर ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी जल्लोष लोककलेचा उद्घाटनास नाट्य व सिनेअभिनेत्री नीलम शिर्के यांची उपस्थिती
बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईची घटक संस्था बालरंगभूमी परिषद मुंबई, यांच्या वतीने दिनांक ३१ ऑगस्ट व दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित जल्लोष लोककलेचा हा बालकलावंतांचा महोत्सव येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्तीच्या अध्यक्षा नाट्य व सिनेअभिनेत्री नीलम शिर्के या उपस्थित राहणार आहेत. तर दिनांक १ सप्टेंबर 2024 रोजी होणा-या समारोप समारंभास सोलापूरच्या नूतन खासदार प्रणितीताई शिंदे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखा करीत आहे.
जल्लोष लोककलेचा महोत्सव
बालरंगभूमी परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रात बालकांच्या कला गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईची घटक संस्था आहे. ही संस्था बाल वयातील तसेच किशोर व कुमार वयातील मुलांमधील नाट्य, अभिनय, गीत गायन, नृत्य, काव्य या व इतर अशा अनेक कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण शिबीर व स्पर्धांचे आयोजन करीत असते. याचाच एक भाग म्हणून बालकलावंतांना महाराष्ट्रातील लोककलावंतांची ओळख व्हावी यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष लोककलेचा या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत हुतात्मा स्मृती मंदिर येथे भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव केवळ महाराष्ट्रातील लोककला प्रकारातील गीत, नृत्य व वाच यावर आधारित असणार आहे.
सहभागी कलावंतांना मोफत भोजन व्यवस्था
जल्लोष लोककलांचा या दोन दिवसीय महोत्सवात सहभागी झालेल्या बालकलावंतांना व त्यांच्यासोबत येणा-या शिक्षकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखा यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
तरी या दोन दिवस संपन्न होणा-या जल्लोष लोककलेचा या कार्यक्रमाचा आस्वाद सोलापुरातील नाट्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन वालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष, कार्यकारणी सदस्य, सल्लागार मंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




