खान्देशची गणराज्ञी कानबाई माता रोट महोत्सवात शोभा देवरे व श्रावण देवरे….

तापी-नर्मदा खोऱ्यातील गाळपेर काळ्या कसदार जमिनीच्या सुपिक भू-प्रदेशावर कानबाई मातेने आपले “कानदेश” नावाचे गणराज्य वसवले. या गणराज्यातील कन्हेर नावाच्या सर्वांग सुंदर पुरुषासोबत तीने लग्न केले म्हणून कन्हेरला ‘राजा’चा दर्जा मिळाला. नंतर पुरुषसत्ताकतेच्या प्रभावात कानदेशचे “कान्हदेश” झाले व नंतर पुढे “खान्देश” झाले.
या गणराज्यात महाराष्ट्रतील नंदुरबार, धुळे, हे दोन जिल्हे पूर्ण, जळगाव जिल्ह्य़ातील पारोळा, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, भडगाव, चोपडा, अमळनेर, चाळीसगाव हे तालुके व नाशिक जिल्ह्यातील क. स. मा. दे. (बागलाण) पट्टा येतो. मध्य प्रदेशातील बडवाणी, पानसेमल, सेंधवा, खेतीया, निवाली आदी भागात कानबाईचा महोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. गुजरात मध्ये अहमदाबाद, सुरत, बडोदरा, भरुच आदी भागात खान्देशी अहिराणी बोलणारे लोक कानबाई महोत्सव साजरा करतात. हे सर्व प्रदेश कानबाईच्या “कानदेश” गणराज्याचा भाग आहेत. मे महिन्यात मोठी कानबाई असते,
यात सामुदायिक विवाह होतात. श्रावण महिन्यात छोटा कानबाईचा महोत्सव असतो. या महोत्सवात ब्राह्मणांना प्रवेश नसतो.. कारण मातृसत्ताक व स्त्रीसत्ताक काळात आर्य-ब्राह्मण भारतात आलेले नव्हते. आर्य-ब्राह्मण भारतात आल्यावर त्यांनी सर्व गणमातांना पापाच्या देवता म्हणून जाहीर केले व त्यांची गणराज्ये नष्ट केलीत.
यावर्षी दोंडाईचा (जिल्हा नंदुरबार) येथे पुतण्या रमेश देवरेकडे कानबाई बसली आहे. या स्त्री-सत्ताक (अब्राह्मणी) महोत्सवाचे फोटो व व्हिडीओ वरीलप्रमाणे -प्रा श्रावण देवरे
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 1 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड क


