सोशल

मंडलनामा क्रमशः 2

मंडलनामा क्रमशः
2

पाथरी ते जालना

 

माझं कुटुंब जालना येथील नाही. आम्ही परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावचे मूळ रहिवासी. जालना माझे आजोळ, आईच्या वडिलांचे गाव. त्यांचे नाव शेख चाँद. वडिलांचे नाव शेख दाऊद व आईचे हबिबा बी. परंपरागतरित्या कापड विणून पाथ्रीत उदरनिर्वाह करणारे माझे कुटुंब खूप गरीब होते. चुलतेही गरीबच. दिवसभरात दहा-बारा वार कापड विणून ते बाजारात विकायचे व आलेल्या पैशातून पोटाची खळगी भरायची. शेती नव्हती. वडील शिकले होते, असे सांगतात. पण उर्दू अक्षर ओळखी पलीकडे त्यांचे शिक्षण नव्हते हे मला नंतर कळाले. आई शाळेत गेली होती असेही सांगतात. पण ती निरक्षरच होती. गरिबीमुळे आमच्या कुटुंबाला पाथरीत घरपट्टी माफ होती, असे लहानपणी ऐकले आहे. आता पाथरी हे गाव थोडे मोठे झाले आहे. पाश्री हे तालुक्याचे गाव असूनही तेव्हा मानवतची बाजारपेठ मोठी होती. तेव्हा मानवत हे पाथरी तालुक्यात होते. त्या लहान गावात हातातोंडाची गाठ पडणे मुश्किलच. पाथरीत असताना माझ्या आई-वडिलांना चार मुले झाली. वडिलांना पाथरीत कुटुंबकबिला चालवणे कठीण जात होते. त्यामुळे माझ्या आजोबांनी (आईच्या वडिलांनी) एक दिवस वडिलांना जालन्याला बोलावून घेतले.

जावयाची विचारपूस, पाहुणचार झाल्यानंतर सहकुटुंब जालन्यात येऊन राहावे, असे आईच्या वडिलांनी सुचवले. माझ्या वडिलांनी आई व त्यांच्या वडिलांशी चर्चा करून संमती दिली. पाथरीपेक्षा जालना खूप मोठे गाव होते. तेव्हा ते औरंगाबाद जिल्ह्यात असले तरी येथील मोंढा खूप मोठा होता. आजही जालन्याचा मोंढा (बाजार समिती) मोठा आहे. मराठवाड्यात अनेक शहरे
वाढली असली तरी जालना व लातूरच्या बाजार समितीचा तोरा अजून कायम आहे. त्याकाळी जालन्याच्या मोंड्यात शेतमालाची लाखो रुपयांची उलाढाल कायची. हा पैसा बाजारात खेळायचा. जालन्याच्या बाजारात चैतन्य होते. हा पैसा पाझरत आपल्या कुटुंबात येईल, असे वडिलांना वाटायचे. जावयाचे भले होईल, असे आजोबांना वाटायचे, माहेरीच राहायला आल्यामुळे आई खुश होती. परंतु, फक्त खुश झाल्याने पोट भरत नाही. त्यासाठी घाम गाळून काम

करावेच लागणार होते. जालन्यात आले तरी हातातोंडाची गाठ पडणे अवघड होते. वडिलांचा स्वभाव खुपच मृदूः मुखदुर्बलच म्हणा ना! आपण भले की आपले काम भले. त्या मानाने माझी आई हरहुन्नरी. पण स्वातंत्र्यपूर्व काळातील गरीब मुसलमान कुटुंबातील बाईची झेप किती असणार? माहेर असल्याने तिच्या ओळखीपाळखी वडिलांपेक्षा जास्त होत्या. अडनडीला माहेरची माणसे होती. पण माहेरही तिच्यासारखेच गरीब. त्यामुळे जालन्यात येऊनही कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत

फार फरक पडला नाही.

अन्सारी कुटुंबाचा मुक्काम जालन्यातील साळी गल्लीत पडला. शनी

मंदिराजवळ साळी गल्ली आहे. आता तिच्या भौतिक परिस्थितीत बदल झाला

आहे. त्याकाळी साळी गल्लीत सर्व विणकर कुटुंब राहत असत. तेव्हा गावागावात अशा एकजातीय वस्त्या होत्या. गावगाड्यातील आलुतेदार, बलुतेदारांच्या व्यवसायानुसार वसलेल्या वस्त्या. अनेक ठिकाणी एकच व्यवसाय करणारी विविध धर्माची कुटुंबे त्या त्या वस्त्यात राहत असत. जालन्यात तरी विणकर जातीमध्ये असे होते. साळी व अन्सारींची वस्ती एकत्र होती. गरज पडल्यास एकमेकांची मदत घेता येत असे. हिंदू, मुसलमानांत दारिद्र्याचे वाटप समान होते. या सर्वांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. त्याकाळी जालन्यात सूत विकणारी मारवाड्याची काही दुकाने होती. त्या

दुकानांतून सूत खरेदी करायचे व दिवसभर हातमागावर कापड विणायचे. माझे आई-वडील दोघे मिळून दिवसभरात दहा-बारा वार कापड विणत. ते बाजारात दुकानदाराला विकायचे. काही ग्राहक थेट घरी येऊन खरेदी करत. मात्र त्यामुळे कमाईत फार फरक पडत नसे. माझ्याहून मोठे असलेले बशिरोद्दीन, शेख मोहंमद, राबिया बी, जमालोद्दीन, मी व माझ्या पाठीवरचा मोहंमद इक्बाल ही सहा लेकरं व आई-वडील, असे आठ जणांचे कुटुंब. एवढ्यांचे
पोट भरायला दोघांचे कष्ट कमी पडत. सर्वात मोठा भाऊ आई-वडिलांना मदत

करायचा नाही. तो शिंपीकाम करायचा. तो तसा आधीपासून स्वतंत्र वृत्तीचा होता. तो त्याच्यापुरता विचार करायचा. दोन नंबरचा भाऊ विणकामात थोडीशी मदत करून विड्या वळण्यासाठी जायचा. त्याचे काही पैसे मिळत. तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ लहान होता. तो सांगितले ते काम करायचा. पण या तिघांना पूर्ण शिक्षण घेता आले नाही. दारिद्र्यच एवढे होते की, शिकले पाहिजे, असे कोणाला सुचलेही नाही. माझ्या या तीन मोठ्या भावांना शाळेचा कंटाळाही होता. त्यांनी शाळेचे तोंड पाहिले, अक्षर ओळख करून घेतली व शाळा सोडली. वडिलांनाही त्यांची मदत पाहिजेच होती. आजूबाजूचे वातावरणही तसेच होते. स्वातंत्र्याची पहाट झाली असली तरी शिक्षणाचा कोंबडा अजून आरवायचा होता.

 

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button