महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.30

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.30
महात्मा फुले जडणघडण
१७
झाला आहे. त्यांनी धर्मसंस्थेवर वारंवार कोरडे ओढले आहेत. पण त्यांची प्रेरणा धर्माच्या शुद्धीकरणाची होती धर्मभावना नष्ट करण्याची नव्हती. धर्मभोळेपणा आणि ईश्वरविषयक उथळ, अज्ञानमूलक व असत्य मतप्रणाली यांचा बीमोड करताना खरे ईश्वरज्ञान, नीती आणि माणुसकीची भावना यांचा हास होऊ देता कामा नये असा त्यांनी धर्मसुधारकांना इशारा दिला आहे. टॉमस पेन यांनी आपल्या धर्ममीमांसेत प्रथम ईश्वराचे एकत्व आणि मानवी समता या दोन तत्त्वांवर आपली दृढ श्रद्धा आहे असे म्हटले आहे. परंतु एवढ्याने आपल्या भूमिकेचा सुस्पष्ट व पुरेसा बोध होणार नाही, म्हणून आपण नेमके काय मानत नाही तेही निवेदन करण्याची त्यांनी दक्षता घेतली आहे. धर्म ही एका अर्थी प्रत्येक ईश्वरोपासकाची अत्यंत जिव्हाळ्याची अशी खाजगी वैयक्तिक बाब आहे. जगाचा निर्माणकर्ता परमेश्वर आणि त्याला अनन्यभावे शरण जाणारा मनुष्य यांच्यात कुणाही मध्यस्थाला अधिकृत स्थान असण्याची मुळीच आवश्यकता नाही. म्हणून मी ज्यू, रोमन, ग्रीक, तुर्की, प्रॉटेस्टंट किंवा इतर कोणतेही धर्मशासन (चर्च) मानत नाही. “My own mind is my own church.” माझे स्वतःचे मन हेच माझे धर्मशासन आहे, धर्मश्रद्धा ही स्वतंत्र व स्वयंस्फूर्त असली पाहिजे. तिच्यावर कुठल्याच बाह्यसत्तेचे अधिराज्य असता कामा नये. एकदा का घर्माला संस्थात्मक रूप प्राप्त झाले, आणि धर्मसंस्था व शासनसंस्था यांचे संबंध परस्परपूरक झाले की, दंडसत्तेच्या जोरावर, मग ती सत्ता राजाची असो वा धर्माध्यक्षाची असो, धर्माच्या मूलतत्त्वांच्या खुल्या चर्चेला प्रतिबंध केला जातो. सामान्य माणसाची धर्मजिज्ञासाच मारली जाते. लोकांची धर्मश्रद्धा धर्मसंस्थेच्या दावणीला बांधण्याचा खटाटोप सुरू होतो. केवळ बाह्य शक्तीवर विसंबून राहिल्यास ही गोष्ट बिनबोभाट सिद्धीस जाणे कठीण आहे हे लक्षात येताच मनुष्याच्या आंतरिक श्रद्धेची दिशाभूल करण्याचा मार्ग अवलंबिण्यात येतो. त्यासाठी मनुष्याच्या आंतरिक श्रद्धेची दिशाभूल करण्याचा मार्ग अवलंविण्यात येतो. त्यासाठी ईश्वरदत्त पवित्र धर्मग्रंथांचा आधार उपयोगी पडतो. वेद, कुराण, वायवल अशा ईश्वरप्रणीत मानल्या गेलेल्या एका विशिष्ट ग्रंथाचे प्रामाण्य हे धर्मनिष्ठेचे पहिले लक्षण मानले जाते. या प्रमाणग्रंथाचे भाष्यकार पुन्हा
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01


